⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

शिक्षण सेवक भरतीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीचे आदेश द्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाकडून अनुसूचित जमातीचे विशेष पदभरती – २०१९ (पद शिक्षण सेवक) प्रकिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. तर महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जळगाव जिल्हा परिषद प्रशासनाने देखील ही प्रक्रिया तात्काळ राबवून अनुसूचित प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी पात्र उमेदवारांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ च्या अपिल क्र. ८९२८/ २०१५ व इतर याचिकांमध्ये दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नुसार २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार व ग्रामविकास विभागाकडील २४ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार तसेच २६ डिसेंबर २०१९ च्या शासन पत्रानुसार महाराष्टातील सर्व जिल्हा परिषदांसह जिल्हा परिषद जळगांव प्रशासनाकडून ही अनुसूचित जमाती विशेष पदभरती – २०१९ (पद शिक्षणसेवक) जाहिरात क्र. ०२/२०२० दि. २ जानेवारी २०२० ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. परंतु कोरानामुळे भरती प्रकिया रखडली होती.

महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हा परिषदा ( बुलडाणा, नाशिक, रायगड, पुणे, नागपूर, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर व इतर जिल्हा परिषद) यांनी अनुसूचित जमातीचे विशेष पदभरती -२०१९ (पद शिक्षण सेवक) प्रकिया पूर्ण केली आहे. व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहे. मात्र, जिल्हा परिषद जळगांव प्रशासनाने आता पर्यंत ही अनुसूचित जमातीची विशेष पदभरती २०१९ शिक्षण सेवक प्रकिया पूर्ण केलेली नाही.

सर्वच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अमंलबजावणीनुसार सदर पदभरती प्रकिया पूर्ण करून अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेसंदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचे वरील संदर्भीय शासन आदेश आलेले आहेत. तरी आतापर्यंत फक्त दि. १० डिसेंबर २०२१ रोजी ११९८ पात्र अपात्र उमेदवारांची अंतरिम यादी प्रसिद्ध केली. तसेच अपात्र उमेदवारांना आक्षेप घेण्यास दिलेला दि. २ डिसेंबर २०२१ च्या कालावधी ही संपलेला आहे. पुढील पदभरती प्रकिया पूर्ण करणे संदर्भात विविध आदिवासी संघटना व सदर पदभरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांकडून जिल्हा परिषद जळगांव प्रशासन यांना वेळोवेळी अनेक निवेदन देण्यात आलेले आहे.

मात्र, जिल्हा परिषद जळगांव प्रशासनाकडून सदर पदभरती प्रकिया आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही. तसेच दुसरीकडे सदर पदाची पद भरती प्रकिया महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदांनी पूर्ण केलेली आहे. सदर सर्व बाबी जिल्हा परिषद जळगाव प्रशासनास माहित असून ही सदर शिक्षण सेवक पद भरतीतील पात्र उमेदवाराना नियुक्ती पत्र देणे संदर्भात जिल्हा परिषद जळगाव यांनी अव्वर सचिव ग्रामविकास विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दि. १७ मार्च २०२२ च्या पत्राद्वारे मार्गदर्शन मागितले आहे. व सदर बाबीवर आता पर्यंत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही एक खूपच अन्यायकारक असंवेदनशील गंभीर बाब आहे. तरी सर्वोच्च नायायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीनुसार व महाराष्ट्र शासनाच्य आदेशानुसार उचित व योग्य कार्यवाही होऊन शिक्षणसेवक पदभरती लवकर पूर्ण व्हावी. व अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देऊन न्याय द्यावा, अशी मागणी पात्र उमेदवार कुवरसिंग खर्डे आणि रोशन पावरा यांनी केली आहे.