चोरवड नाक्यावर पुन्हा अवैध वाहतूक रोखली : 20 जनावरांची सुटका

ऑक्टोबर 27, 2021 12:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । चोरवड ( ता. रावेर ) येथील आरटीओ चेक पोस्टवर मध्यप्रदेशातून आलेला ट्रकची तपासणी केली असता त्यात पुन्हा २० गुर आढळून आले. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या माहितीवरून ट्रक ताब्यात घेतला असून, २० गुरांनां जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आली आहे.

Untitled design 3 2 jpg webp

सविस्तर असे की, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक पुन्हा चोरवड चेक पोस्टवर रोखण्यात आरटीओ प्रशासनाला यश आले आहे. 20 गुरांची निर्दयतेने होणारी वाहतूक रोखत या गुरांची जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजता रावेर तालुक्यातील चोरवड आरटीओ चेक पोस्टवर मध्यप्रदेशातून आलेला ट्रक ( यु.पी.75 एम.1107 ) वरील चालक कागदपत्राची तपासणीसाठी वाहनाखाली उतरल्यानंतर आरटीओ निरीक्षक आर.डी.निमसे यांना चालकाच्या हालचालीविषयी शंका आली. यावेळी अधिकारी ट्रकजवळ पोहोचल्यानंतर कागदपत्रांची तपासणी न करता ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला.

 

यांनी केली कारवाई 

यावेळी रावेर पोलीस ठाण्याचे फौजदार विशाल सोनवणे, पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, प्रदीप सपकाळे, श्रीराम कांगणे या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक ताब्यात घेऊन त्यातील 20 गुरांची सुटका करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now