जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच IBPS ने प्रोबेशनरी ऑफिसरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष पदवी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. IBPS PO Bharti 2025

या भरतीद्वारे एकूण ५२०८ जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२५ आहे. IBPS PO Recruitment 2025

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी
पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणार उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा. तसेच अर्जदाराचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ पूर्वी आणि १ जुलै २००५ नंतर झालेला नसावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षे सूट दिली जाईल आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट दिली जाईल.
या बँकांमध्ये होणार भरती?
या अधिसूचनेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूसीओ बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामधील या बँकामध्ये ही भरती होणार आहे.
अर्ज शुल्क
सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ८५०/-
एससी/एसटी/पीएच: १७५/-
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेटद्वारे शुल्क भरता येते.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
पीओ भरतीची निवड – प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत.
प्रिलिम्समधील कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना मेन्ससाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यातील व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
वेतनश्रेणी – रु. ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२-६७१६०-२६८०/७-८५९२०












