---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन

Big Breaking : जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल नवीन जिल्हाधिकारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यात राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपाचे आयुक्त अमन मित्तल यांची निवड करण्यात आली आहे.

aman mittal abhijit raut jpg webp

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांचे कडून जारी करण्यात आले आहेत.

---Advertisement---

अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली होईल अश्या चर्चा सुरू होत्या. अभिजीत राऊत यांनी आपल्या जिल्हाधिकारी असण्याच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील कोरोना चांगल्या रीतीने हाताळला यामुळे त्यांचे राज्यभर कौतुक झाले. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. त्यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल हे 2015 बॅचचे जिल्हाधिकारी असून त्यांची आजवरची कारकीर्द उत्तम राहिली आहे. मित्तल यांनी नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा तरुण, तडफदार अधिकारी लाभले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---