मी राजकारणात येणार नाही – उज्वल निकम

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | राज्य आणि देशपातळीवर अनेक महत्त्वाचे खटले लढवणारे, ज्येष्ठ विधतज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपण राजकारणात येणार नसल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उज्वल निकम असे म्हणाले आहेत.

ujwal nikam jpg webp

”सध्या तरी राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. कारण राज्याच्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढुळता निर्माण झाली आहे, ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तीने सध्या तरी राजकारणात येणं योग्य नाही. असं माझं मन मला सांगत आहे. असे निकम म्हणाले.

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याआधीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now