मी त्या गद्दारांना म्हणालो होतो “गेट आउट” – उध्दव ठाकरे
जळगाव लाईव्ह न्युज | २१ सप्टेंबर २०२२ | ज्यांना शिवसेना सोडायची आहे. त्यांनी आत्ताच सोडून जा. ज्या नगरसेवकांना पळून जायचं आहे. त्यांनी आत्ताच जा. मी त्या गद्दारांना पण हेच म्हणालो होतो आणि यापुढे गद्दारी करणाऱ्यांना तेच म्हणीन ‘गेट आऊट’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षातून फुटलेल्या आणि फुटणाऱ्या लोकप्रतिनिधींना धारेवर धरलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक मी खुर्ची मुद्दामून ठेवली आहे कारण की संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसाठी लढत आहेत. ते ‘मिंदे’ नाहीत.
याचबरोबर काही लोक माझा बाप चोरायला निघाले आहेत. आजपर्यंत पोरं चोरणारी टोळी ऐकली होती पण पहिल्यांदा मी आज बाप चोरणारे पाहतोय. असे उद्धव ठाकरे म्हणाले. याच बरोबर ज्यांना मी सत्तेचं दूध पाजलं तेच आज उलट्या करायला लागले आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीका केली.