धावत्या रेल्वेच्या जिन्यावर आली झोप अन काळाने घातला घाला

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । मित्रांसोबत मुंबईला कामासाठी जाणाऱ्या तरूणाला जिन्यावर डुलकी लागली लागल्याने दरवाजातून पडून रेल्वेच्या चाकाखाली दुदैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. मध्यरात्री हि भयावह घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली

crime jpg webp

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रमेश रमग्य पासवान हा २१ वर्षीय युवक आपल्या मित्रांसोबत गोरखपूर – मुंबई रेल्वेने (क्र. २०१०४) मुंबई येथे कामासाठी जात होता. रेल्वेने प्रवास करत असताना पासवान हा रेल्वेच्या दरवाजात बसलेला होता. तेव्हा त्याला अचानक झोपेची डुलकी आली आणि तो रेल्वेच्या चाकाखाली आला. त्यात तो जागीच ठार झाला.

सदर धक्कादायक घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रविवार मध्यरात्री १२:३५ वाजताच्या सुमारास घडली. येथून जवळ असलेल्या खडकी खांब नंबर- ३२१/२४-२२ दरम्यान हि घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला.

दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now