अजित पवारांच्या निर्णयामुळे मी निराश झाली आहे – सुप्रिया सुळे
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । शरद पवार अंधारात न ठेवता अजित पवार हा निर्णय अधिक सन्मानपूर्वक घेऊ शकले असते. पण त्यांच्या या निर्णयामुळे मी निराश झाले आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीच शरद पवारांना अंधारात ठेवलं नाही. प्रत्येकाने शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे कारणही सांगितले.पण अजित पवारांच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही, पण मला धक्का बसला आहे, अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
शरद पवारांनाही अजित पवारांच्या या निर्णयाची काहीच कल्पना नव्हती. जर पवार साहेबांना याची पुसटशीही कल्पना असती तर साहेबांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती.बंडखोरी केलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई केली नसती. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या
रविवारी मी अजितदादांच्या निवासस्थानी गेले होते. पण दादांच्या मनात काय चाललंय याची मला काहीही माहिती नव्हतं.काही वेळानं एक-एक करून आमदार देवगिरी बंगल्यावर येऊ लागले आणि मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनाकडे रवाना झाले, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.