⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दि.1 मार्च रोजी विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे.

सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते रुद्रअभिषेक व हवन पूजा करून सोहळा पार पाडण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता महादेवाची आरती परिसरातील भाविकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता शहरातील सुप्रसिद्ध श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी समुहसह भजन सादर करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता महादेवाची महाआरती होणार आहे.

कीर्तनकार ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोनी नगर परिसरातील शिवभक्तांनी उपस्थिती रहावे असे आवाहन शिवभक्तांकडून करण्यात आले आहे.