---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात घरफोडीचे सत्र थांबेना ! बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून या घटनांमध्ये होत चालली आहे. सोमवारी शहरातील तालुका व एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या तीन घटनांची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद येथे चोरट्यांनी एका महिलेचे बंद घर फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. वैशाली मधुकर चौधरी (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, म्हसावद) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत.

chalisgaon gharfodi 44 thousand

२८ ते ३० ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ७० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर एमआयडीसी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील प्लॉट नंबर ७ मध्ये इन्स्टाकार्ड सर्व्हिसेस कंपनीत दि. १ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे पत्रे कापून १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरून नेली.

---Advertisement---

ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. पवन किशोर गाडीलोहार (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---