जळगावमध्ये ठाकरे गट व शरद पवार गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नोव्हेंबर 13, 2025 4:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शहरातील माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

svjl

आगामी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना शिंदे गटाने जळगावमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का दिला.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अण्णा भापसे, जिजाबाई भापसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटांच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now