⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | पर्यटन | कधीकाळी होता 100 रुपये पगार, आता.. अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतोय ‘इतका’ पगार?

कधीकाळी होता 100 रुपये पगार, आता.. अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतोय ‘इतका’ पगार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, या राम मंदिरात 87 वर्षांचे आचार्य सत्येंद्र दास हे 34 वर्षांपासून मुख्य पुजारी म्हणून सेवा बजावत आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने त्यांच्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

ट्रस्टने आचार्य सत्येंद्र दास यांना आजीवन पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांचे वाढते वय आणि खराब प्रकृती लक्षात घेऊन ट्रस्टने त्यांना कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला आहे, परंतु त्यांना इच्छा असेल तेव्हा मंदिरात येऊन पूजा करण्याची सुविधा दिली आहे. आचार्य सत्येंद्र दास 1 मार्च 1992 पासून रामजन्मभूमीत मुख्य अर्चक म्हणून सेवा देत आहेत. सुरुवातीला त्यांना महिन्याला केवळ 100 रुपये वेतन मिळत होते, तर आता त्यांना 38,500 रुपये महिन्याला वेतन मिळत आहे. राम मंदिरात आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह अन्य 13 पुजारी सेवा देत आहेत. नुकत्याच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली आहे.

रामललाची मूर्ती टेंटमध्ये विराजमान असतानापासून आचार्य सत्येंद्र दास भगवंतांची पूजा-अर्चना करत आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी झाली होती, तेव्हाही ते मुख्य पुजारी होते.

आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, “ट्रस्टचे सदस्य मला भेटले आणि आरोग्य आणि वाढत्या वयामुळे मंदिराच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला. त्यांनी आजीवन वेतन देण्याचे म्हटले आहे.” आचार्य सत्येंद्र दास संस्कृतच्या प्रकांड विद्वानांमध्ये गणले जातात. त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्याची पदवी घेतली होती आणि 1976 मध्ये अयोध्यातील संस्कृत महाविद्यालयात प्राध्यापक झाले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.