⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आम्ही मध्यरात्री कसे भेटायचो? मुख्यमंत्र्यांनी सत्य सांगितल्यावर फडणवीसांनी लावला कपाळाला हात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, फटकेबाजी करतानाही त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड हसवले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री भेट कशी व्हायची? याचा खुलासा शिंदेंनी केला.

शिंदेंच्या या खुलाशानंतर फडणवीसांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली.मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो”. एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका, अशी म्हण्याची वेळ फडणवीसांवर आली. एकनाथ शिंदेच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे ११५ आणि आमचे ५० असे मिळून १६५ झाले.

यावेळी शिंदे म्हणले कि, विदानपरिषदेवेळी माझी सरकली होती. आमचे दोघे पडले तर म्हणतील गद्दारी केली, म्हटलं दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला सांगतो दोन्ही निवडून आले. आम्हाला फोन आले साहेबांचे, म्हणाले आपले दोन्ही निवडून आले, पुढे चालले. म्हटलं ते पुढे चाललेत पण आता मी कुठे चाललोय मला माहिती नाही. मी आपला सुसाट गेलो. तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग केलं नाही. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो. याचं तिकडे पुढे आहे ना आपलं बॉन्ड्रीच्या बाहेर तिकडे गेलो, असं म्हणत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. तेव्हा शिंदे म्हणाले की आता लपवायचं काय? तुमच्याकडे टॉवर लोकेशन, सगळं आहे. पटापट पटापट माहिती पडलं. नाकाबंदी केली, आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मीही काहीतरी, कितीतरी वर्षे काम केलंय ना. मलाही माहितीय नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते, असं शिंदे यांनी सांगितलं.

अजितदाद तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे १६५ नाही, आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणणार,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.