यावल

कर्ज काढून घरी आणलेले २५ हजार लंपास

crime 18 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । तालुक्यातील मोहराळा येथील एकाने घर बांधण्यासाठी बँकेतून कर्जरूपाने अाणलेले २५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवले. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.


मोहराळा येथील संजय सुरेश अडकमोल यांनी याबाबत फिर्याद दिली. घराचे बांधकाम करण्याकरिता त्यांनी नुकतेच मोहराळा येथील बँकेतून २५ हजार रुपयांचे कर्ज काढून ते पैसे घरातील कपाटात ठेवले होते. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत जाण्यासाठी ते कुटुंबीयांसह सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी रोकड चोरून नेली. हा प्रकार रात्री १०.३० वाजता अडकमाेल घरी परतल्यावर त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी शुक्रवारी सकाळी यावल पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पाेलिसांनी किरण मगन खैरे रा.मोहराळा या संशयितास ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Back to top button