⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | राशिभविष्य | जुनी लफडी डोकं वर काढणार; जाणून घ्या शनिवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल?

जुनी लफडी डोकं वर काढणार; जाणून घ्या शनिवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष
अत्यंत महत्त्वाच्या मित्राशी भेट होईल. परीक्षा किंवा एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन सहकारी भेटतील. कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नका. नाही तर व्यापारात बाधा येऊ शकते. गीत,संगीत, कला आणि अभिनयाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल. नव्या उद्योगाची योजना यशस्वी होईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात सावध राहा. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने सरकारी क्षेत्रात प्रभाव वाढेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.

वृषभ
आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्षेत्रात प्रियजनांची साथ मिळेल. व्यापारात प्रगती होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशी जाण्याचा योग आहे. तुमच्या व्यक्तीगत समस्या तात्काळ सोडवा. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. नोकरदारांना आजचा दिवस चांगला जाईल. आज खरेदीत अधिक खर्च होईल.

मिथुन
आज संतान सुख मिळेल. जुन्या मित्रांकडून शुभ समाचार ऐकायला मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याला. आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते. नोकरीतील आजचा दिवस चांगला जाईल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. तंत्रज्ञानाशी संबंधिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज नवा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापारात नवीन साथीदार मिळतील. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. पण काहीशी किरकीरही जाणवेल. राजकारण्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. बेरोजगारांसाठी आज दिवस त्रासदायक असेल. रोजगारासाठी इकडे तिकडे भटकावे लागणार आहे.

कर्क
कार्यक्षेत्रात नव्या लोकांचं सहकार्य आणि सानिध्य लाभेल. महत्त्वाच्या कार्यात कठोर मेहनतीनंतर यश मिळेल. नोकरीत उच्च पदस्थांना आज लाभ मिळेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा, नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल. कृषी आणि पशुपालन करणाऱ्यांना मोठा सन्मान मिळेल. विदेशात नोकरीसाठी जाण्याचा योग आहे. एखादं अपूर्ण कार्य पूर्ण केल्यावर मनोबल उंचावेल.

सिंह
कार्य क्षेत्रात बऱ्याच सुधारणा घडवून येतील. त्यामुळे अनेक समस्या दूर होतील. व्यापार क्षेत्रातील लोकांनी नियोजनबद्ध काम केल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. आत्मबळ वाढेल. रोजगाराचा शोध घेणाऱ्यांना आज आनंद वार्ता मिळेल. त्यांचा रोजगाराचा शोध संपेल. राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तीचं मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मित्र मैत्रीणी भेटतील. अभ्यासात रुची वाढेल.

कन्या
राजकारणातील लोकांनी आज जीभेवर नियंत्रण ठेवावं. नाही तर अनेक गोष्टी बिघडू शकतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं सानिध्य लाभेल. कुटुंबात आजचा दिवस चांगला राहील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. वाहन खरेदी करण्याची इच्छा आज पूर्ण होईल. अभिनय क्षेत्राशी संबंधितांना आजचा दिवस अत्यंत लाभकारी असणार आहे. जुनी लफडी डोकं वर काढतील. प्रेमी युगलांचा भांडाफोड होईल.

तुळ
एखादी महत्त्वकांक्षा पूर्ण होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. विशिष्ट व्यक्तीचं मार्गदर्शन आणि सानिध्य प्राप्त होईल. उद्योगात भागीदारी असेल तर सावध राहा. घाटा होण्याची शक्यता आहे. वादविवाद करणं टाळा. आज प्रकृतीच्या समस्या जाणवतील. बाहेरचं खाणं टाळा. मित्रांना भेटणं टाळा. खरेदीचा योग आहे. अधिक खर्च करू नका.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आणि उन्नतीचाही असणार आहे. वैयक्तिक आयुष्यात मोठे निर्णय घ्याल. विदेशात जाण्याचा योग आहे. किंवा लांबचा प्रवास संभवतो. देणेकरी त्रास देतील. उधारी देऊन टाका. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात बदल केल्याने लाभ होईल. व्यापारातील अनेक निर्णय पथ्यावर पडतील. कुणालाही दुखवू नका. सर्वांना सोबत घेऊन चालल्यास फायदा होईल.

धनु
व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्याल. त्यामुळे फायदाच होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळीच डॉक्टरकडे जा. नवदाम्पत्यासाठी आजचा दिवस धावपळीचा जाईल. घरी पाहुणे येण्याची शक्यता. खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू नका. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना परदेशात जाण्याचा योग आहे.

मकर
आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे. शेतीच्या कामाला लागाल. कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दानधर्मात दिवस जाईल. चार पैसे खर्च होतील. जमीनजुमल्याशी संबंधित प्रकरणं मार्गी लागतील. घरात मोठेपणा मिळेल. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. पत्नीशी वाद होईल. मुलाशी पटणार नाही.

कुंभ
कोर्ट कचेरीच्या प्रकरणात आज तुमच्या बाजूने निकाल येऊ शकतो. त्यामुळे आनंदाचा दिवस जाईल. गावाकडे जाण्याचा योग आहे. जुने मित्र भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल. एखादी जमीन किंवा वाहन खरेदी कराल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. गाडी हळू चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विनाकारण कुणावर भडकू नका. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन
कार्यक्षेत्रात अनेक संघर्षानंतर आज चांगला फायदा होणार आहे. नोकरीतून महत्त्वाच्या पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे. राजकारणात असाल तर तुमच्यावर आज चिखलफेक होऊ शकते. खोटे आरोप केले जाऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना पत्नीचा सल्ला घ्या. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सोयऱ्याधायऱ्यांशी चर्चा करा. पूर्ण विचार केल्याशिवाय व्यापारात कोणताही बदल करू नका. नाही तर मोठी अडचण होऊ शकते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.