⁠ 
शनिवार, मे 18, 2024

आजचे राशीभविष्य- १६ फेब्रुवारी, वाचा कसा जाईल आजचा तुमचा दिवस?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष राशी
नवीन उपक्रम करण्यासाठी संधी मिळणार. कर्जाची रक्कमंजूर होणार शेतीचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी नविन तंत्रज्ञान वापरावे. महिलांना उत्पादनाची गुणवत्ता वाढबरोबरच जाहिरात करणे किंवा प्रकाशन या ठिकाणी चांगली प्रगती होणार. विद्यार्थ्यांनी रंग, चित्रकला संगीत, किंवा पोलीस भरती प्रक्रिया मध्ये यश मिळणार.

वृषभ राशी
योग्य दिशा मिळाल्यामुळे आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा होणार. अंगीकृत क्षेत्रात, धार्मिक आध्यात्मिक या माध्यमातून उत्कृष्ठ कामगीरी केली जाणार. महिलांना पशु संवर्धन, संगीतवाद्य, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांना आपल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असणार. विद्यार्थ्यांना नविन कोर्स,झालेले अभ्यासक्रम, किंवा वार्ताहर म्हणुन नावलौकिक मिळणार.

मिथुन राशी
सकाळच्या सत्रात महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकले पाहिजे. घरातील वाद मित्वण्यासाठी वेळ द्यावा लागणार. कधीतरी मनविरोधत कामे करावी लागणार. महिलांना सार्वजनिक जीवनात कटू अनुभव येतील. नोकरीत सहकाऱ्यांना मदत करावी लागणार. विद्यार्थ्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही.

कर्क राशी
सत्ता, पैसा, किंवा राजकीय जीवनात पद कायम राहणार नाही पण जोडलेले माणसे मात्र कायम राहणार याचे भान ठेवून वागणे बोलणे योग्य ठरणार. कधीतरी दुसऱ्याचे मत विचारात घेतले पाहिजे. महिलांनी जे महत्वाचे कामे आहे ते सकाळी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा. दुपारच्या सत्रात वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कुठलीही प्रलोभनांना बळी पडू नये. रात्र थोडी आणि सोंगे जास्त अशी बिकट अवस्था होणार.

सिंह राशी
व्यवसायात, उदोगात, लहान चुकाकडे दुर्लक्ष करू नये.खानावळ, हॉटेल व्यवस्थापन, भाजीपाला, पिकांची देखालीसाठी जातीने लक्ष द्यावे लागणार. महिलांना घरातील लहान मुलांची प्रगती सध्याकरण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार.वन्य औषधी वनस्पतीची काळजी या ठिकाणी स्वतःच कामे पूर्ण करावी. विद्यार्थ्यांना भाऊ बहिणीच्या कामात सहकार्य करावे लागणार उच्च शिक्षण, राज्य स्तरीय क्रीडा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार.

कन्या राशी
सकाळच्या वेळी महत्वाचे निर्णय घेतले पाहिजे. देवाण घेवाण, उसनवारी, सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार. दुपारच्या सत्रात आपले कर्तव्य पार करण्यासाठी वेळ द्यावा. महिलांनी यशाने हुरळून जाऊ नये. माणसाची पारख केली पाहिजे. नोकरीत सहकाऱ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अती विश्वास ठेवू नये.परीक्षा, मैदानी खेळ, पोलीस भरती या ठिकाणी कठोर परिश्रम घ्यावे लागणार.

तुला राशी
घेतलेली जबाबदारी पार झाल्यानंतर विश्रांती घेतली पाहिजे मेडिकल स्टोअर्स, नैसर्गिक खते, शेतकऱ्यांना आर्थिक आवक वाढणार. महिलांना सार्वजनिक राजकीय क्षेत्रात उत्तम लाभ होणार. विद्यार्थ्यांनी फुलाचे संवर्धन,कागद, छापखाना या ठिकाणी चांगली प्रगती होणार.

वृश्चिक राशी
व्यवसाय कच्चा माल भाजीपाला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी विक्री या ठिकाणी मनाप्रमाणे यश मिळणार धार्मिक आध्यात्मिक, पूजा साहित्य या ठिकाणी जास्त प्रमाणात फायदा होईल. महिलांनी सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय घेणे लाभदायक ठरेल. घरातील आपली जबाबदारी पार करू पतीच्या उदोगात लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना नविन वस्तूची निर्मिती व कृषिविषयक अभ्यास पूर्ण करावा.

धनु राशी
सकाळी लवकरात लवकर भगवंताची उपासना करून नित्याचे कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा. दुपारच्या सत्रात एखादी आंदाची बातमी समजणार. महिलांना बालसंगोपन परिचारिका शिक्षक किंवा पोलीस अधिकारी म्हणुन नावलौकिक मिळणार. नियोजीत व्यवसायात यशस्वी होणार. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, मैदानिखेल, प्रवासी साधने, पशुवैद्यकी अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार.

मकर राशी
कुठल्यावेळी कोणाला महत्व द्यावे याचे भान असणे आवश्यक असते. जवळच्या माणसा कडून धोका संभवतो. आपले रहस्य पैसा कोणालाही सांगू नये. महिलांनी महत्वाच्या निर्णयात पतीचा सहभाग घेतला पाहिजे. पोटदुखी, ताप किंवा अस्वस्थ वाटू लागणार. विद्यार्थ्यांनी वाईट संगती मुळे कारावास होऊ शकतो. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी ठेवावी.

कुंभ राशी
सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय इतरत्र कोठेही लक्ष देऊ नये. मित्र मैत्रिणी यांच्या मदतीच्या प्रतिक्षेत राहू नये. लाकडी काम बांधकाम, मजूर यांनी आपल्या बोलण्यात गोडवा ठेवल्यास लाभ होणार. महिलांनी स्व्यपाक करणे बेकरी उद्योगामध्ये सावध रहावे. विद्यार्थ्यांना विद्युत पंप, विद्युत उपरणे निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार.

मीन राशी
सकाळी लवकरात लवकर आपले महत्वाची बैठक यशस्वी करण्यासाठी वेळ द्यावा. दुपारच्या सत्रात अचानकपणे अडचींमुळे त्रास होऊ शकतो. महिलांनी थंड पाणी, बर्फाचा कारखाना, हॉटेल व्यवस्थापन या ठिकाणी नुसकान होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना कीर्तन प्रवचन, गायन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार अपयशनंतर पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत

हे देखील वाचा :