मुक्ताईनगर

उचंदेसह वढवे येथील युवकांचा मनसेत प्रवेश!

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व वढवे येथील तरूणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई हे होते.

jalgoan 7 jpg webp

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पक्षप्रमुख ठाकरे हे त्यांच्या विचाराने ब्रँड आहे. शिवाय जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नवनिर्माण करण्याचे स्वप्न आहे. तुमच्यात उत्साह असल्याचे पाहून खरच आनंद होत असल्याचे मत तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. उचंदे येथील ग्राम पंचायत सदस्य समाधान भोलाणे, सुदर्शन पानपाटील, कृष्णा पाटील, सलमान शाह, भाईदास जहागीर, प्रल्हाद सदाशिव, प्रेम कोळी, यांनी पक्षप्रवेश केला.

वढवे येथील गजानन पाटील, चेतध पाटील, निखिल पाटील, रोहीत पाटील, भानुदास बेलदार, राहुल बेलदार, तेजस बेलदार, विष्णु बेलदार, पिंटु बेलदार आदी युवकांनी प्रवेश घेतला. यावेळी उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी, गजानन पाटील, मुकेश झाल्टे, चेतन पाटी, निखिलपाटील, रोहित पाटील, भानूदास बेलदार, राहुल बेलदार, तेजस बेलदार, विष्णू बेलदार, पिंटू बेलदार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button