जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षी जळगाव जिल्ह्यातून उत्कृष्ठ तलाठी म्हणून एका तलाठ्याला गौरवण्यात येते. यंदा या पुस्कारासाठी यावल तालुक्यातील अंजाळे येथील तलाठी एस.व्ही. सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. त्यांचे १ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे उपस्थित होते. तलाठी सुर्यवंशी यांना मिळालेल्या उत्कृष्ट तलाठी पुरस्कारा बद्दल तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसिलदार आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी सचिन जगताप, शेखर तडवी, एम.एच. तडवी, बबीता चौधरी, पी. ए. कडनोर, तलाठी इश्वर कोळी सह आदींनी त्यांचे अभिनंदन केले.