⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

घराला भीषण आग : होरपळून वृद्ध महिलेसह 4 जनावरांचा मृत्यू


जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ ।
शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथे शनिवारी दुपारच्या सुमारास तीन घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीत 60 वर्षीय वृद्ध महिलेसह 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या आगीत नवशीबाई बाबूलाल चव्हाण वय ६० या महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

        शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथे कैलास बाबु चव्हाण हे अपंग आई नवशीबाई चव्हाण राहत होते.घराच्या बाजूला गुरांचा गोठा असून त्यात चारा देखील साठवून ठेवण्यात आला होता.दरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चाऱ्याला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात भडका घेत तीन घरांना गवसणी घातली.आगीचे लोळ घरात घुसत असल्याने सदर अपंग महिलेला घराबाहेर निघताच आले नाही.या आगीत नवशीबाई बाबू चव्हाण ही महिला आगीत होरपळून मृत्यू झाला. त्याचबरोबर गोठ्यात बांधलेले 4 जनावरे,दोन मोटारसायकली घरातील संसारोपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.आगीची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला माहिती देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला दरम्यान अग्निशामक दलाचे

बंब तत्काळ घटनास्थळी पोहचत आग विझविली अग्नीशामक दलाच्या मदतीने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.मात्र घरात अडकून पडल्याने महिलेला व जनावरांना वाचविण्यात अपयश आले सदर महिलेस उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.याप्रकरणी गोरख लालाचंद बंजारा यांनी खबर दिली असून थाळनेर पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील कारवाई थाळनेर पोलिसांकडून सुरू आहे

           नागेश्वर बंगला येथीलआगीची दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुक्यातील आमदार काशीराम पावरा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून दुर्घटना ग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून व स्वता कडून आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले