जळगाव लाईव्ह न्यूज : 20 नोव्हेंबर 2023 : सध्या भूकंपाच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच महाराष्ट्र मधील हिंगोली जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हदरला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नसली तरी यामुळे घबराटीचं वातावरण पसरलं आहे.
रविवारी रात्री औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी,वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा शिंदे , कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूगर्भातून गुढ आवाज येऊन अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची पळापळ झाली.
काही घरांमधील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पोलीस व महसूल पथक या गावांमध्ये पाठवले असून नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.