मोठी बातमी : ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक, विद्यार्थ्यांचे आंदोलन भोवले

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेच त्याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.

hindustani bhavu

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी सोमवारी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.

हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने स्पष्ट केले होते की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक आम आदमी आहे. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन केलं.”

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहित केल्याने हिंदुस्थानी भाऊविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now