⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सावदाच्या स्वामीनारायण मंदीरात हिंदोळे उत्सव सुरू

Savada News- जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा येथील सुमारे १०० वर्ष पुरातन स्वामीनारायण मंदीरात परंपरेनुसार यंदा कोरोना कालावधी नंतर हिंदोळे उत्सवाचे आयोजन आषाढ तृतीय ते श्रावण तृतीय या एक महिनाभर करण्यात आले आहे. यात दररोज सायंकाळी 6 ते 7 दरम्यान सुंदर अशी गुजराती व मराठी भजने सादर करत असतात.

यासाठी भगवंतास सुंदर अश्या लाकडी पाळण्यात प्रथम पंधरा दिवस व नंतर पंधरा दिवस चांदीच्या पाळण्यात ठेवून झुलवत असतात. सुंदर अशी आरास देखील केली जाते, होणाऱ्या भजनांनी वातावरण भक्तिमय होऊन जाते. हिंदोळे उत्सवात येथे असंख्य भावीक दर्शनासाठी येत असतात.