⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Heavy Winter : नागरिकांनो थंडीचा तडाखा वाढतो आहे

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविलेल्या थंडीचे पुन्हा जोरदार कमबॅक झाले आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल ४ अंशांची घट झाली आहे. गुरुवारी १४ अंशांवर असलेला पारा शुक्रवारी १० अंशांपर्यंत खाली आला होता. शुक्रवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच १० अंशांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अजून तीन ते चार दिवस थंडीचा कडाका राहणार असून, त्यानंतर काही दिवस पुन्हा किमान तापमानात चार ते पाच अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

यंदा थंडीचे आगमन जरा उशिराच झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच थंडीचे आगमन झाले होते. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली होती. मात्र, आता थंडी सुरु झाली आहे. पर्यायी रात्रीचे तापमान १४ ते १५ कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

आठवड्याभरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात वाढ होती होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जम्मू- काश्मीरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. त्यानंतर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्येही बर्फवृष्टीला सुरुवात झाली असल्याने उत्तरेकडील वारे सक्रिय झाले आहेत, तसेच त्या वायांचा वेग व प्रमाणही जास्त असल्याने, पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आ

किमान तापमान

१९ नोव्हेंबर १२ अंश

२० नोव्हेंबर १२ अंश

२१ नोव्हेंबर १३ अंश

२२ नोव्हेंबर १४ अंश

२३ नोव्हेंबर १३ अंश