माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अपिलावर २६ रोजी सुनावणी

ऑक्टोबर 23, 2021 2:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संदर्भात चौधरी यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. या अपिलावर २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे.

JDCC Bank Jalgaon jpg webp

जिल्हा बँक निवडणुकीसाठी भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा विकास सोसायटी गटातून अर्ज दाखल केला होता. दरम्यान, हा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या संदर्भात माजी आमदार संतोष चौधरी यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. या अपिलावर २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास अपिलकर्त्याचे काही एक म्हणणे नाही, असे समजून निकाल दिला जाईल, असे विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी म्हटले आहे.

निर्णयाकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. खासदार रक्षा खडसे, माजी आ. स्मिता वाघ, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. चौधरी यांनी अर्ज बाद झाल्यानंतर सहकारी संस्थेचे नाशिक विभागीय निबंधक यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. या अपिलावर मंगळवार, २६ रोजी दुपारी १ वाजता नाशिक येथील गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीच्या या निकालाकडे राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now