⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । येथील सुधर्मा संस्था व मन:शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने तांबापुरा व खेडी येथील कचरा वेचणाऱ्या १८ महिलांची नुकतीच आराेग्य तपासणी करण्यात आली.

सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे व मन:शक्तीचे अभय खांदे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला. डॉ. तेजस राणे‌ यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली गेली. डाॅ. भावना चौधरी यांच्याकडेही महिलांची माेफत वैद्यकीय तपासणी केली गेली. गोदावरी मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. जयंत देशमुख यांच्या मदतीने सर्व महिलांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात आली. तपासणी केलेल्या महिलांची हिमाेग्लाेबीनची पातळी खालावली हाेती. तसेच रक्तदाब, थॉयराइड व क्षयराेगाची लक्षणे त्यांना अाढळली. उपक्रमाचा समाराेप भाऊंचे उद्यान येथे झाला. या वेळी महापाैर जयश्री महाजन उपस्थित हाेत्या.