---Advertisement---
महाराष्ट्र

भावाच्या हळदीला पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेला.. अन्

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडत असलेल्या तरुणाच्या कारला झाला आणि या अपघातात त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बोईसर मार्गावर उमरोळी हा अपघात झाला असून कैफ इसरार खान (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

accidenbt jpg webp webp

अधिक माहिती अशी कि , कैफ इसरार खान हा नवविवाहित तरुण आहे. त्याचा नुकताच विवाह झाला आहे. त्याचा चुलत भाऊ अल्तमस जुनेद खान याच्या हळद समारंभासाठी गुरुवारी बोईसर येथे गेला होता. बोईसर येथे हळद समारंभ आटोपल्यानंतर आपल्या काही नातेवाईकांना सोडण्यासाठी कारने पालघर येथे परतत असताना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याच्या कारचा भीषण अपघात झाला.

---Advertisement---

कारचे टायरफुटल्याने कैफ याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीला कारने जोरदार धडक दिली.यावेळी कैफ गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---