घाबरवत दहावीच्या विद्यार्थींनीला म्हणाला “मी तुझ्यावर प्रेम करतो” ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज : १६ मार्च २०२३ :  भडगाव तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या दहावीच्या विद्यार्थींनाचा पाठलाग करून “मी तुझ्यावर प्रेम करतो” अस म्हणत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित मुलीचे बोर्डाचे पेपर सुरु आहेत. बोर्डाचे पेपर सुरू आहेत. १ मार्च ते १५ मार्च दरम्यान दहावीचा पेपर देण्यासाठी जात असतांना योगेश अशोक पाटील हा तिचा पाठलाग करत होता. दरम्यान बुधवार १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पिडीत मुलीचा त्याने रस्ता आडविला.

त्यानंतर ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.. तु का नाही म्हणत आहे’.. असे बोलून तिचा हात पकडला. त्यानंतर ‘तु मला ध्यानात ठेवू मी तुला बघुन घेईन’ असा दम दिला. आणि तिचा विनयभंग केला. प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांच्या विरोधात बुधवार १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर करीत आहे