सण-उत्सवांपूर्वी जळगाव पोलिसांची मोठी कारवाई ; ५० सराईत गुन्हेगार हद्दपार

ऑगस्ट 6, 2026 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात आगामी काळात येणारे सण व उत्सव अत्यंत शांततेत, निर्विघ्नपणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावेत, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने समाजकंटक आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार ७ कुख्यात टोळ्यांतील १५ गुन्हेगारांसह ३५ वैयक्तिक सराईत गुन्हेगार अशा ५० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून, या सर्वांची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे.

haddpar crime jpg webp

जिल्ह्यात सातत्याने गंभीर गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून हद्दपारीचे आदेश लागू असलेल्या टोळ्या आणि वैयक्तिक गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सण-उत्सवांच्या काळात कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात किंवा संबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

या कारवाईमध्ये जळगाव शहर, एमआयडीसी, नशिराबाद, चोपडा, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, यावल, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले आरोपी :

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्द :

  1. आकाश उर्फ खंडया सुकलाल ठाकुर रा. तुकारामवाडी, जळगाव
  2. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर रा. तुकारामवाडी, जळगाव
  3. आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी, जळगाव
  4. आकाश अरुण दहेकर रा. जाखणीनगर, कंजरवाडा, जळगाव
  5. टारझन उर्फ बल्लू अरुण दहेकर रा. जाखणीनगर, कंजरवाडा, जळगाव
  6. अमन उर्फ खेकडा रशिद सैय्यद रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव
  7. रवी प्रकाश चव्हाण रा. नाथ गल्ली तांबापुरा, जळगाव
  8. गुरुदयालसिंग मनजिसिंग टाक रा. नाथ गल्ली तांबापुरा, जळगाव
  9. गिरीष किशोर घुगे (वंजारी) रा. खंडेरावनगर, जळगाव

एरंडोल पोलीस ठाणे हद्द
10) करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार रा. गांधीपुरा, एरंडोल
11) समीर उर्फ सनी आनंदा संदानशिव रा. गांधीपुरा एरंडोल

नशिराबाद पोलीस ठाणे हद्दः
12) वसीम शहा रहेमान शहा रा. मोमीन मोहल्ला नशिराबाद
13) सादीक शहा हाफिजउल्ला शहा रा. मोमीन मोहल्ला नशिराबाद

रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दः
14) अक्षय उर्फ बाब्या बंन्शीलाल धोबी रा. रथ चौक बारीवाडा, पिंप्राळा, जळगाव
15) सागर उर्फ भोला अरुण भोई रा. भोईवाडा पिंप्राळा, जळगाव

जळगाव शहर व परिसर (जिल्हापेठ, शनिपेठ, एमआयडीसी, नशिराबाद):
16) भुषण मनोज अहीरे रा. भवानी माता मंदिरा जवळ, जळगाव
17) तेजप दिलीप सोनवणे, रा. पार्वताबाई नगर कांचननगर, जळगाव
18) राकेश भिमराव सपकाळे रा. नागसेननगर रामेश्वर कॉलनी, जळगाव
19) फिरोज शहानुर शहा रा. मोमीन मोहल्ला नशिराबाद

भुसावळ विभाग (बाजारपेठ, शहर, तालुका):
20) चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे रा. भुसावळ
21) संदिप बुधा खंडारे रा. दिनदयाल नगर, भुसावळ
22) नशिरशहा जनाबशहा फकीर रा. निंभोरा ता. भुसावळ
23) जितु अलियास जान उर्फ जितु ज्योती जान (तृतीयपंथी) रा. समतानगर, भुसावळ
24) योगेश देविदास तायडे रा. मोहन नगर, भुसावळ
25) शेख मुस्ताख शेख अनवर रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ
26) सिकंदर अली बशारतअली सैय्यद रा. हद्दीवाली चाळी, भुसावळ
27) सम्राट कुमार सुरेश बनसोडे रा. स्नेहल कॉलनी, भुसावळ
28) शाकीर उर्फ गोलु शेख रशीद रा.३२ खोल्या, भुसावळ
29) गणेश बळीराम कोळी रा. जावाई नगर, धरणगाव (कलम 57 अन्वये)

पाचोरा व पिंपळगाव हरेः
30) विक्रम उर्फ बुट्या विनोद अहिरे रा. बाहेरपुरा पाचोरा
31) मुक्तार ऊर्फ धड्या मेहबुब शेख रा. कुर्बान नगर, पाचोरा
32) किरण साहेबराव शिंपी रा. जनता वसाहत पाचोरा
33) भगवान लक्ष्मण पाटील रा. सार्वेपिंप्री ता.पाचोरा
34) सचिन बापुराव पाटील रा. सार्वेपिंप्री ता. पाचोरा
35) जावेद उर्फ जाबीर बल्लु पिजारी रा. कुर्बान नगर, पाचोरा
36) सलमान शेरू पिंजारी रा. कुर्बान नगर, पाचोरा
37) प्रकाश दुधा राठोड रा. हनुमानवाडी गाळण ता. पाचोरा
38) विजय देविदास मांडोळे रा. गाडगेबाबा नगर, पाचोरा
39) ज्ञानेश्वर उर्फ सोनु समाधान गायकवाड रा. आंबेवगाव ता.पाचोरा

चाळीसगाव विभाग (शहर, ग्रामीण, मेहुणबारे):
40) प्रविण पुरुषोत्तम धनगर उर्फ आण्णा रा. वाघळी ता. चाळीसगाव
41) सुशिल विलास निकाळजे रा. नेताजी चौक, चाळीसगाव
42) ऋषीकेश उर्फ मायकल दिपक पाटील रा. श्रीकृष्ण कॉलनी, करगाव रोड चाळीसगाव
43) पवन दिपक पाटील रा. भऊर ता. चाळीसगाव

भडगावः
44) प्रविण उर्फ भावडु सुभाष नाथ रा. खालची पेठ भडगाव
45) योगेश कैलास पाटील रा. वाक ता. भडगाव
46) सागर रविद्र ह्याळीगे रा. पिंपरखेड ता. भडगाव

जामनेर (फत्तेपुर):
47) सुनिल पांडुरंग पारधी रा. फत्तेपुर ता. जामनेर
48) विजय पांडुरंग पारधी रा. फत्तेपुर ता. जामनेर

चोपडा व धरणगाव
49) भैय्या उर्फ विजय लोटन पाटील रा. बोरोले नगर, चोपडा
50) सोनु उर्फ स्वप्निल पांडुरंग धनगर रा. धरणगाव

दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याची माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासाठी नागरिकांनी पोलीस आपत्कालीन क्रमांक ११२, पोलीस नियंत्रण कक्ष – ०२५७-२२२३३३३ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now