जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । रात्रीच्या सुमारास फिरण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी ओढून नेल्याची घटना शहरातील व्यंकटेश मंदीराजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात पायी फिरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कला नरेंद्र भंसाली (वय-६६) रा. बालाजी पार्क, व्यंकटेश मंदिराच्या जवळ, या बुधवारी १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरटा जवळ येवून त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम सोन्याची चैन गळ्यातून जबरी हिसकावून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेने आरडाओरड केली परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याबाबत गुरुवारी १४ एप्रिल रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहेत.











