⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

हतनूर धरणाचे ६ दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । ‘‘विदर्भ आणि मध्यप्रदेशात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे आज सोमवारी दुपारी ४ वाजेला ६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सध्या १० हजार ३४७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात आणि विदर्भात पाऊस पडत आहे. त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. त्यामुळे आज सोमवारी धरणाचे ०६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदीपात्रात १० हजार ३४७ क्युसेक पाणी सोडण्यात आले. प्रकल्प पाणीपातळी २०९.२०० मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाली आले आहेत.

दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असला तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणाच्या साठ्यात पाण्याची आवक कमी आहे.