घृणास्पद : पतीचा जुळाभाऊ असल्याचा फायदा घेत दिराने वाहिनीवर केले अत्याचार


जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । भावाचा जुळा भाऊ सारखा दिसतो याचा फायदा घेऊन स्वतःच्या वाहिनीवर अत्याचार करण्याची घटना घडली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, नवरा आणि तिचा दीर यांच्यामध्ये कमालीचे साम्य आहे. रात्री झोपल्यावर पती लघुशंकेचे निमित्त करुन निघून जायचा आणि त्याच्या जागी दीर येऊन तिच्यावर अत्याचार करायचा अशी तक्रार लातूरमधील शिवाजी चौक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात अली आहे. हि घटना लातूर मध्ये उघडकीस आली आहे.

rape jpg webp

अधिक माहिती अशी कि , हा प्रकार साधारणतः एक वर्षापूर्वीचा आहे. ही महिला आता माहेरीच राहात असून नवऱ्यासोबत नांदण्यास येण्यास तिने नकार दिला आहे. त्या नंतर तिने ही तक्रार दाखल केली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

या घाटानेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेने कुटूंबाच्या व्याख्येला काळिमा फासली आहे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. याचबरोबर नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now