⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | राशिभविष्य | आजचे राशीभविष्य : हरतालिकेला ‘या’ राशीच्या आर्थिक क्षेत्रामध्ये लाभ होईल

आजचे राशीभविष्य : हरतालिकेला ‘या’ राशीच्या आर्थिक क्षेत्रामध्ये लाभ होईल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष – आजचा दिवस मेष राशींच्या लोकांसाठी आनंदित जाईल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लागेल. एकूण खर्च किती केला याचा हिशोब ठेवता लागेल. खर्चाचे प्रमाण खूप वाढते राहील.

वृषभ – आज तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात नवीन तंत्र मंत्र आणाल.कौटुंबिक जीवनामध्ये समाधान साधण्याचा आजचा दिवस आहे. पैशाचे व्यवहार आज मार्गी लागणार आहेत असे दिसते आहे.

मिथुन – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रूप्रीडा नाही. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. थोड्या आजाराने कटकटी वाढतील पण त्या बाजूला सारून ठेवा. आजचा दिवस याचा विचार करण्याचा नाही.

कर्क – जिद्द आणि चिकाटी याच्यामुळे स्वबळावर अनेक गोष्टी जिंकाल. नातेवाईकांचे सहकार्य आपल्याला फायद्याचे ठरेल. शेजाऱ्यांची मदत मिळेल.

सिंह – आर्थिक क्षेत्रामध्ये लाभ होईल. कलाक्षेत्रात संधी लाभेल. कलाकारांना मानसन्मान प्रसिद्धीचे योग आज आहेत. मन रमवण्याचा प्रयत्न कराल. हरतालिका व्रत स्त्रियांनी करावे.

कन्या – तुमचा इतरांवर आज प्रभाव राहणार आहे. ठरवलेली दैनिक कामे योग्यरीत्या मार्गी लागतील. कोणत्याही निर्णय घेताना फक्त दोलायमान स्थिती टाळावी असा आजचा सल्ला आहे.

तूळ – कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता कामाला लागा. काही जणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विनाकारण मनस्ताप टाळा.

वृश्चिक – महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडणार आहेत. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने दिवस दुधात साखर पडणार आहे. दिवस छान राहील.

धनु – तुमचे कार्यक्षेत्र रुंदावणार आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढ. ठरलेल्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. प्रवास होतील.

मकर – एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग होईल. हरितालिकेची उपासना विशेष फलदायी ठरेल. शिव पार्वतीचा जप करावा.

कुंभ – महत्वाची कामे शक्यतो आज नकोत. प्रवासही टाळावेत. सर्व गोष्टी कामे करताना सावधगिरीने वागावे. अमाप पैसे मिळवण्याच्या नादात शरीर आणि मनाचे नुकसान नको.

मीन – आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधता येईल. विवाह उत्सुक उमेदवारांचे विवाह होतील. विशेष आनंदी वार्ता येतील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.