रंगभरण स्पर्धेत हर्षिता धामणेचे लक्षणीय यश

एप्रिल 25, 2022 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथील कलाश्री बहुउद्देशीय संस्थेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गुड शेफर्ड विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी हर्षिता मिलिंद धामणे हीने इयत्ता ८ वी ते १० वी या गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

harshita

नगरपरिषदेद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत चित्रकला स्पर्धेतही हर्षिताने यश मिळवलेे. याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरेंनीे सन्मानपत्राने तिला सन्मानित केले. प्रिन्सीपाॅल डी. डॅनिअल बी. दाखले, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now