गुन्हेजळगाव जिल्हाभुसावळ

रेल्वेत दीड लाखांचा डल्ला, पोलिसांनी १२ तासात आवळल्या दोघांच्या मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । रेल्वे प्रवासात दोन प्रवाशांचे महागडे मोबाइल लांबल्याची घटना २६ रोजी घडली होती. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हे दाखल होते. तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे व गुप्त माहितीच्या आधारे केवळ बारा तासांत दोन संशयितांना अटक केली.

शुभंग भूपेंद्रसिंह (रा.पटेल रोड, सूरत) आणि पुष्पराज संतोष कुछवाह (रा.सतना) हे २६ फेब्रुवारीला वेगवेगळया रेल्वे गाडीतून प्रवास करत होते. त्यांचे १ लाख ३४ हजार ३९९ रूपये किमतीचे महागडे तीन मोबाइल चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. भुसावळ लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मीना यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार धनराज लुले, जगदीश ठाकूर, अजित तडवी व आरपीएफचे एएसआय प्रल्हासिंग, वसंत महाजन, इम्रान खान, भूषण पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर १२ तासांतच राजू लक्ष्मण कोळी (वय ४२, रा. आहुजा नगर, जळगाव) व संजय साहेबराव गोराडकर (वय ३६, रा.गांधी नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. तपास हवालदार राहुल गवई, आनंदा सरोदे हे करत आहे.

Related Articles

Back to top button