जळगावात पोलिसांच्या धडक कारवाईत २८ लाख ८१ हजारांचा गुटखा जप्त!

जून 10, 2026 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२६ । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

gg

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक आज १० जून रोजी गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त माहितीच्या आधारे जळगाव शहरातील अंजाळे चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील डिझो पेट्रोल पंप परिसरात सापळा रचण्यात आला.

संशयित चारचाकी (MH१९CX-३२८०) वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मागील बाजूस महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विमल सुगंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संयुक्त कारवाई केली. या कारवाईत २१,८१,६००/- रुपये किमतीचा प्रतिंबंधीत विमल सुगंधित गुटखा व पानमसाला असलेल्या ५८ गोण्या व ७,००,०००/- रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचे बोलेरो पांढ-या रंगाचे पॅकबाडी असलेले मालवाहू वाहन असा मिळून एकूण २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वाहनचालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलगाव, ता. धरणगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक नितीन गाणपुरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धडक करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now