गुन्हेजळगाव जिल्हा

सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सावद्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. चिनावल गावातील उटखेडा रस्त्यावर, सुकी नदीवरील पुलाजवळून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर, सावदा पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आणि लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे हे आरोपी होते. सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अजय शांताराम कोळी (रा. रोझोदा), यश उर्फ योगेश पितांबर चौधरी (रा. चिनावल), आणि अस्लम सलीम तडवी (रा. लोहरा, ता. रावेर) या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत विविध ब्रँडचे गुटखा आणि सुगंधित तंबाखू, ज्यांची एकूण किंमत १ लाख २८ हजार ५५७ रुपये असून, ९५ हजार रुपये किंमतीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सावदा पोलीसांनी या अवैध कार्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button