चोपड्यातुन २५ लाखाचा गुटखा जप्त : पोलिसांची मोठी कारवाई

 जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । चोपडा येथे नागलवाडी रोडवर खळबळजनक घटना घडली आहे. रात्री बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले आहे. ज्यातून २५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

crime jpg webp

अधिक माहिती अशी की, चोपडा ते नागलवाडी रोडवर असलेल्या शिवमंदिरात जवळून एक पिकअप व्हॅनमध्ये बेकायदेशीररित्या गुटखाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागलवाडीरोडवर सायंकाळी ८ वाजता कारवाई करत वाहन क्रमांक (एमएच २० सिटी ६९६४) या वाहनांची तपासणी केली . यावेळी व्हॅनमध्ये २० लाख ४० हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा त्यांना मिळाला व तो त्यांनी हस्तगत केला. याप्रकरणी संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर (वय-३५) रा. तांबापुरा आणि अजय अरुण पाटील रा. चोपडा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर आणि अजय अरुण पाटील यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now