जळगाव शहरराजकारण

..नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन ; मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊतांवर भडकले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२३ । मालेगावातील ठाकरे गटाच्या जाहीर सभेदरम्यान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना भावना देणारे कांदे तसेच शिंदे व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती. या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा अरे मिंधे असा एकेरी शब्दात उल्लेख करत आम्ही दिलेले आधी मत वापस कर. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका कर नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन अशा आक्रमक शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगड कोणत्या झाडाला मारले जातात की ज्याला फळ आहेत, मला फळ लागली आहेत त्यामुळेच राऊत माझ्यावर टीका करत आहेत असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

godavari advt

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button