⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | नणंदची भाजपवर टीका, भावजयने दिल असं प्रत्त्युत्तर ; पहा काय म्हणाल्या…

नणंदची भाजपवर टीका, भावजयने दिल असं प्रत्त्युत्तर ; पहा काय म्हणाल्या…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा जोऱ्यात असून यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहे. दरम्यान, अब की बार 400 के पार’ असा नारा भाजपकडून देण्यात येत असून यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज सकाळीच भाजपवर जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला भावजय आणि भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहिणी खडसेंनी भाजपवर टीका केली.‘मुंगेरीलाल के हासीन सपने’ असाच हा 400 पारचा नारा भाजपचा राहणार आहे. कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. त्यांच्या टीकेला रक्षा खडसेंनी उत्तर दिलं आहे.

शेवटी तुम्ही विरोधक कितीही बोलत असले तरी शेवटी जनतेचा बोट हे कमळावर पडणार आहे. ते तुम्ही कसं काय थांबणार? नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून हे तुम्ही कसं काय थांबवणार? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत. माझ्या विरोधात अपूर्ण व्हिडिओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. विरोधकांचे माझ्यावर आरोप आहेत की, विकास झालेला नाही. त्यांना मला सांगायचं आहे की माझ्या समोर येऊन बसावं. चार काम विचारतात तर 100 काम आम्ही केलेली आहेत, ती जाणून घ्या. समोरच्यांच्या डोक्यात चार काम असतील.

मात्र आमच्या डोक्यामध्ये विकासाचे असंख्य काम आहेत, असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. रावेर लोकसभेचे विजयाचे टार्गेट आमचं पाच लाखांच्यावर आहे. मात्र साडेतीन लाखाच्या वर मात्र विजय नक्कीच होईल, असं म्हणत रक्षा खडसेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.