⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

उद्धव ठाकरेंच्या मशालला मत देणे म्हणजे.. ; जळगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव न्यूज | 2 मे 2024 | उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाद व हिंदुत्वादाची लढाई सोडली त्यांनी अफजलखान याकूब मिनन त्यांच्या कबरीला सुशोभित करण्याचं काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना बघितलाय. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी व मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसचा जाहीरनामा हा गोवंश हत्येला सपोर्ट करतोय. गोवंश हत्त्येला सपोर्ट करणारा काँग्रेसचा ही जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केलाय, अशीच जोरदार टीका राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे.

चंद्रकांत बावनकुळे हे आज गुरुवारी जळगावात आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या वादळामध्ये महाविकास आघाडी दिसणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती कमजोर झालेली आहे. सत्तेसाठी हापापलेले लोक पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या उरावर येऊन पाहता आहेत. महाराष्ट्रातील असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावाचा ज्याच्या खिशाला कधीही पेन नव्हता. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पळून गेले. लोकनेता म्हणून उद्धव ठाकरे कधीही जनतेत वापरले नाही. बाळासाहेबांच्या पुण्यावर उद्धव ठाकरेंनी राजकारण केलं. जे बाळासाहेबांना अपेक्षित नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत दुकान उघडलं, असंही बावनकुळे म्हणाले..

उद्धव ठाकरे यांच्या मशाला मत देणे म्हणजे राहुल गांधींना, काँग्रेसला व गोवंश हत्येला मत देन आहे हे जनतेला कळालं,. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावरही टोला
नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात मत मागत आहेत कारण ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. काँग्रेस महाराष्ट्रात मत मागू शकत नाही. राहुल गांधी 240 जागा लढत आहेत. त्यामुळे 240 जागा लढणारा प्रधानमंत्री कसे होतील? प्रधानमंत्री होण्यासाठी 272 खासदार लागतात. त्यामुळे पुन्हा एकदा हा देश कुठे नेऊन पाहता आहे ? उद्धव ठाकरेंनी थोडं आत्मपरीक्षण करावं.

शरद पवारांवरही साधला निशाणा
जात धर्म पंथाच्या नावावर शरद पवार यांना मतदान मागाव लागत आहे अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली. जातीपातीचे समाज फोडण्याचे काम शरद पवार यांनी आयुष्यभर केले आहे.सामाजिक व्यवस्था बिघडवणे समाजात समाजात धर्माधर्मात फूट पाडणे हाच आशीचा किरण आता शरद पवार यांना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रात कितीही फिरले तरी महाराष्ट्र महायुतीच्या मागे उभा राहील, असंही बावनकुळे म्हणाले आहे.