⁠ 
सोमवार, मे 27, 2024

लोकसभेच्या तोंडावर भुसावळात शरद पवार गटाला धक्का ; अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भुसावळ । सध्या लोकसभा‍ निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून यातच भुसावळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

भुसावळ येथे नुकतचे भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाला महायुतीचे उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. यावेळी छोटे खानी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.महायुतीतर्फे भाजपाकडून खा. रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या प्रचाराला सुरूवात करण्यात आली.

भुसावळ येथील भाजपा प्रचार कार्यालयाचे नुकतेच आ. संजय सावकारे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाला खा. रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. यावेळी छोटेखानी कार्यालयात खा. रक्षाताई खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी आ. संजय सावकारे यांच्या भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.