---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा

अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२३ । राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्यासोबत 15 आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

ajit pawar gulabrao patil jpg webp webp

नेमकं काय ना. पाटील ?
गुलाबराव पाटील म्हणाले, बरेच आमदार त्यांच्या सोबत आहेत. बघूया. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे. आणि तिथी लवकरच येणार आहे. अजून तरी कूळ बघावे लागेल, गुण जुळावे लागतील त्यानंतर ते काम करावे लागेल, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

---Advertisement---

अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील यांनी हसत उत्तर दिलं. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे सध्या. आकडा ते म्हणतील तोच आकडा होईल, असंही त्यांनी म्हणून खळबळ उडवून दिली आहे.

गुलाबराव पाटील हे जळगावात आले होते. यावेळी त्यांच्याशी मीडियाने संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---