जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. दरम्यान, केळी पिकासह, सोयाबीन आणि कापसाच्या पडणाऱ्या दराबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, केळीच्या दराबाबत अद्याप धोरण ठरलेलं नाही हे सत्य आहे. पण केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे करता ते करणार असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी केलं
तसेच केळी पिकासाठी संशोधन केंद्र व्हावं, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. त्याला मंजूरी देण्याचा प्रस्ताव पुढच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, कापसाच्या किमतीबाबत बोलताना ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात कापसाचे दर हे 9200 पर्यंत गेले होते. त्यानंतर दरात घसरण झाल्याचे पाटील म्हणाले.जोपर्यंत टेक्सटाईल पार्क तयार होत नाहीत. तोपर्यंत कापसाला पाहिजे त्या प्रमाणात दर मिळणार नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. कापसासाठी प्रक्रिया उद्योग होणं गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.