जळगाव जिल्हाराजकारण

धरणगावातील सभेत मुख्यमंत्र्यांसमोर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना धु-धु धुतले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२४ । धरणगावातील सभेत आज जळगाव ग्रामीणचे शिवसेना महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना धो-धो धुतले. आपल्या शायरी अंदाजातून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लाख करो बदनाम तू मेरा नाम ना मिटा पाओगे, क्यूकी मेरे चाहनेवाले मेरा नाम कागज पे नही, दिल पे लिखते है..! अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

आम्ही आमच्या स्व:खर्चाने ५ हजार लोक पंढरपूरला घेऊन यात्रेसाठी. जे मुलं अपंग आहेत त्यांच्यासाठी ५०० ई सायकल दिल्या. त्यातील बरेच रोजगारावर लागली आहेत. आम्ही १३०० मुलींना सायकल वाटप केल्या. आणि ते चोट्ट जीपीएसचा अर्थ काय आहे. माझ्या नांदाला लागू नकोस. मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही अशा शब्दात नाव न घेता गुलाबराव देवकरांवर मंत्री गुलाबराव पाटील बरसले.

ते उठले सुटले धरणगावचे पाणी काढत बसतात. अरे बाबांनो, तेथे प्रशासक आहे तिथे . २० तारीख जाऊदे मंग मी बघतो प्रशासकाला कसं पाणी पाजत नाही तो. यांना म्हणा धरणगावचे रस्ते बघा.. विकासकामे केली. निम्न तापी प्रकल्प , नारपार, भागपूर या सर्व प्रकल्पांना निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सुंदर रस्ते झाले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्याची भरभरून कामे केली.

जनतेला मी मंत्री वाटत नाही. कारण मी सर्वसाधारण आहे. तुमचाच भाऊ आहे मी… एका तरी माणसाने सांगावे कि, गुलाबरावांनी त्रास दिला. मागील पंचवार्षिकला मी ज्यांच्याशी लढलो ते माझ्यासोबत आहे असे सांगितले. विरोधक उमेदवाराला उद्देशून, तुम्ही जळगाव शहरातील राहणारे आहे आणि जळगाव ग्रामीणमध्ये हक्क दाखविता काय ? हे मजूर फेडरेशनमध्ये पैसे कमावतात अन् गुलाबरावावर बोलतात हे योग्य आहे काय ? तेथे एकपण मजूर नाही सगळे स्कॉर्पिओ वाले आहे. मजूर कोण असतो ? जो बीपीएलधारक आहे. हा कसला मजूर ? अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले. शेवटी त्यांनी, मेरे पास न बाप कि दौलत है, न दादाजी कि दौलत है.. मेरे पास केवल बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद कि दौलत है…असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button