रायसोनी महाविद्यालयातील मॅकेनिकलच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । विज्ञानाने मनुष्याच्या पंखात बळ आणले आहे. या बळावर मानव नवनवीन शोध लावत आहे. मानवाच्या जीवनात उत्क्रांती करण्यात शास्त्रज्ञांचा मोठा हात आहे. हे संशोधक लहान वयातच, आपले गुण जगासमोर आणतात. त्याला आकार देण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात गुरुजन करीत असतात. शालेय व महाविद्यालय जीवनात देशात अनेक शास्त्रज्ञ जन्मास आले आहेत. बालमनात वैज्ञानिक शक्ती जागृत झाल्यानेच विज्ञानाने प्रगती केली आहे. भारत देश वैज्ञानिक जगाचे माहेरघर आहे. या देशात अनेक वैज्ञानिक निर्माण झाल्याने भारताने जगावर एक प्रकारचा आदरयुक्त दरारा निर्माण केला आहे तसेच कमी वजनाच्या कमी किमतीच्या मात्र सुसाट वेगाच्या कार सध्या स्पर्धात्मक जीवनात मोलाची भूमिका बजावत आहेत. असे प्रतिपादन जयेश नेहते यांनी शहरातील सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात केले.
महाविद्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागांतर्गत हि कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक हे उपस्थित होते. डॉ. प्रणव चरखा यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, मनुष्यबळ विकास करण्याचे काम गेली अनेक वर्ष रायसोनी इस्टीट्युट करत असून संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रामधील नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच हि कार्यशाळा नक्कीच विध्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळवून देणारी ठरेल. यावेळी त्यांनी रायसोनी इन्स्टिटयूटच्या विविध अभ्यासक्रमांबाबतही माहिती दिली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जयेश नेगटे यांनी गोकार्ट वाहन कसे डिझाईन करायचे यावरही माहिती दिली. यावेळी प्रा. अमोल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी कौतुक केले.