ए.टी झांबरे विद्यालयात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

ऑगस्ट 25, 2023 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे २४ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. त्याचप्रमाणे वर्षा चौधरी यांनी बहिणाबाईंचे जीवन चरित्र सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा व त्यांच्या परिवाराचा परिचय करून दिला.

image 76 jpg webp

अंजुम तडवी, मानस जगताप ,माधुरी हिंगोणेकर, करुणा सुलताने यांनी बहिणाबाईंच्या अरे संसार संसार,आला पहिला पाऊस, अरे खोप्या मंदी खोपा, माणूस या कवितांचे वाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन प्रतिभा लोहार यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी सुचिता शिरसाठ, ई. पी. पाचपांडे, आर. एन.तडवी, डी.बी चौधरी, डी ए. पाटील उपस्थित होते .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now