⁠ 
शनिवार, मे 18, 2024

लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीबांचे मोठे नुकसान ‌

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 एक वर्ष लोटले तरी सर्वत्र कोरोना चे थैमान सुरू असून कोरोना ची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी  लावण्यात आलेल्या लॉक डाऊन सह वीकेंड लॉकडाऊनमुळे  हात गाडी वरील चहा विक्रेते, कापड दुकान, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, दुकाने, या ठिकाणी रोजंदारी ने काम करणारे कामगार, लोट गाडीवरील नाष्टा सेंटर चालक, सायकलीवरून खेड्यावर जाऊन कुल्फी विकणारे, दाळ्या, मुरमुरे, फुटाणे, खारे शेंगदाणे, विक्री करणारे या हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांचा बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या घटकांवर रोजचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या मजुरांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे अशी जाणकारांची सूचना पुढे येत आहे. 

एरंडोल शहरासह ग्रामीण भागात या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉक डाऊन मुळे या गोरगरिबांची रोजंदारी बुडत आहे. गुढीपाडव्यानंतर अजून मोठा लॉक डाऊन लावला जाणार असल्यामुळे या गोरगरिबांन मध्ये चिंता पसरली आहे. दुकाने बंद असल्यामुळे मजुरांची रोजंदारी बुडालेल्या मुळे घर कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासुन उभा आहे.

सतत होणाऱ्या लॉक डाऊन मुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर व किरकोळ विक्रेते यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे आजारपण व कुटुंबाच्या चरितार्थासाठी लागणारा खर्च कसा करावा असा प्रश्न त्यांना त्रस्त करीत आहे. विशेष हे की कोरोना च्या या महामारी मुळे व लॉक डाऊन मुळे सर्वत्र देण्या-घेण्याचे उधार उसनवारी चे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा चिंताजनक स्थितीत या घटकांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

ऑटो  रिक्षाचालक, काली पिली चालक , मालवाहतूक गाडी चालक, यांनी बँकांकडून कर्ज काढून गाड्या घेतल्या सध्या कोरोना काळामुळे प्रवासी बाहेर पडत नसल्यामुळे. व मालवाहतूक  सुद्धा  मिळत नसल्यामुळे बँकांचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न त्यांना त्रस्त करत आहे तसेच कुटुंबाची रोजची गुजराण ची करावी अशी समस्या त्यांना भेडसावत आहे. वाहनांपासून मिळणारे उत्पन्न बुडत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे.

कोरोना बरोबर, कोरोना पेक्षाही अधिक मोठे आर्थिक संकट जनसामान्यांना हैरान करीत आहे त्यामुळे हा घटक अवैध सावकारी कडे नाईलाजास्तव वळत आहे. असे बोलले जाते. अवैध सावकारी करणारे जास्त व्याजदर लावून गोरगरिबांना पैसा देतात मात्र खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक लुबाडणूक ते करीत आहेत.

कोरोना मुळे आमची चहाची टपरी बंद राहिल्याने  आमचे गेल्या वर्षभरात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे आम्ही  लोकांकडून कर्ज काढून कुटुंबाचे पालन पोषण करीत आहोत. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी आहे.

– विशाल पाटील
चहा टपरी चालक, बुधवार दरवाजा एरंडोल