घरात आजाेबांचा मृत्यू अन् एकीकडे बारावीचा पेपर; विद्यार्थ्याने न खचता घेतला ‘हा’ निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भुसावळ येथील डीएस हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारा रितेश लालचंद संगत या विद्यार्थ्याच्या आजाेबांचे जामनेर येथे निधन झाले. यानंतरही त्याने मंगळवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर दिला. पेपर सुटण्याच्या पूर्वीच त्याचे नातेवाईक रितेशला घेऊन गेले.
रितेश संगत हा डीएस हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा देत हाेता. ताे मूळ जामनेर येथील रहिवासी असून सध्या भुसावळात मामाकडे राहताे. त्याचा मंगळवारी हिंदी विषयाचा पेपर हाेता. त्याच वेळी त्याच्या आजाेबांचे जामनेर येथे निधन झाले. मात्र, शिक्षणाची गाेडी आणि परीक्षा देणे अत्यंत महत्वाचे असल्याने रितेशने मंगळवारी हिंदीचा पेपर दिला. यानंतर १.४० वाजता नातेवाइक त्याला परीक्षा केंद्रातून घेऊन गेले. केंद्र प्रमुख एम.टी.सपकाळे, सुनील साेनार यांनी त्याला धीर दिला. यानंतर सर्व जण जामनेरला रवाना झाले.