महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! चौथ्या हप्त्याच्या थकबाकीबाबत शासन निर्णय जाहीर..

मे 24, 2023 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । तुम्हीही राज्याचे सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत शासनाने आज म्हणजेच बुधवारी शासन निर्णय प्रसिध्द केला आहे

sarkari employee jpg webp

काय म्हटलं आहे शासन निर्णयात?
या शासन निर्णयात म्हटले आहे की, सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना दि. 01 जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि सेवानिवृत्तीच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम यथास्थिती भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी तर सेवानिवृत्ती धारकांना रोखीने अदा करण्यात यावी.

तसेच जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थामधील पात्र कर्मचा-यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. जे कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचा-यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरित हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

याबाबतचा राज्य शासनाने शासन निर्णय आज दि. 24 मे 2023 रोजी प्रसिध्द केला आहे. त्यामुळे शासकीय तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या मोठा अर्थिक लाभ मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now