⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बाहेती महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग, जाणून घ्या काय आहे स्थिती

बाहेती महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग, जाणून घ्या काय आहे स्थिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । शहरातील सर्वच महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अकरावी व पदवी शिक्षणासाठी आता विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. शहरातील अँड.एस.ए.बाहेती महाविद्यालय येथे अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी ३९८  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु आहे.

अनेक उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी व पदवी शिक्षणासाठी आपापला प्रवेश ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करताना दिसत आहेत. शहरातील एस. ए. बाहेती महाविद्यालय इथे देखील विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करताना दिसून आले.

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आले. परंतु आता कोरोना निर्बंध कमी झाल्यमुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घेऊ शकतात. मिळालेले गुण व हव्या त्या शाखेत प्रवेश घेऊ शकतात.

अँड. एस. ए. बाहेती महाविद्यालयात अकरावी कला शाखेत १६० जागा असून आजपर्यंत १११ विद्यार्थ्यांनी, वाणिज्य शाखेत २०० जागा असून १६६ विद्यार्थ्यांनी तर विज्ञान शाखेत १२० जागा असून १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

तसेच FY. B.com (वाणिज्य) २२० जागा असून २०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. SY. BA (कला) १२० जागा असून ५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. बाहेती महाविद्यालयात पदवीची विज्ञान शाखा अद्याप सुरु नाही. सोबतच अँड. एस. ए. बाहेती महाविद्यालयात BBA व BCA साठीच्या ४० जागा असून विद्यार्थ्यांनी अधिक माहिती साठी महाविद्यालयाला भेट द्यावी.

ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया

अँड. एस. ए. बाहेती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश निश्चित करून नंतर महाविद्यालयात आवश्यक ते कागदपत्र जोडून व प्रवेश फीचे चलन भरून महाविद्यालयात जमा करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत आहे. या बद्दलची संपूर्ण माहिती प्राध्यापक अनिल लोहार यांनी दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह